आरोग्य

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण – सोलापूर जिल्ह्यात बालकांचा उत्तम प्रतिसाद

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील ९१ टक्के बालकांना पोलिओ लसीचा लाभ 

सोलापूर: महाराष्ट्र शासन , सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील नागरी , ग्रामीण व शहरी भागात मा. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील , मा . आरोग्यमंत्री , ना. तानाजी सावंत , मा. जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम पार पाडण्यात आली . सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माळशिरस तालुक्यात सहाय्यक संचालक , कुटुंब कल्याण , पुणे डॉ ढवळे यांनी लसीकरण मोहिमेचे उद्घाटण करण्यात आले. डॉ संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद , सोलापूर यांच्या हस्ते तुंगत तालुका पंढरपूर , येथे उद्घाटण करण्यात आले . जिल्हा शल्य चिकित्सक , डॉ सुहास माने यांनीही बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला .

जिल्ह्यातील ग्रामीण , नागरी भागातील पाच वर्षाखालील एकूण ३४२८०७ बालके असून ग्रामीण भागात एकूण २४१८ आणि नागरी भागात २१० लसीकरण केंद्र , ११९ मोबाईल टीम , १२० ट्रान्झीट टीम स्थापन करण्यात आले होते . सोलापूर जिल्ह्यात ९१ टक्के ( ३१११४३ ) बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली . उर्वरित बालकांना ५ मार्च २०२४ ते ७ मार्च २०२४ या तीन दिवसात आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कार्यकर्ता यांचेमार्फत घरोघरी , वाडी वस्ती , उसतोड टोळी , वीट भट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस पाजण्यात येणार आहे .

सदरची मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरून सहाय्यक संचालक कुटुंब कल्याण पुणे डॉ. ढवळे ह्या सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत . राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले , जिल्हा शल्य चिकित्सक , सुहास माने , जिल्हा मात बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ एस पी कुलकर्णी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक / जिल्हा आयुष अधिकारी विलास सरवदे , जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख , जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी , आरोग्यवर्धिनी चे वैद्यकीय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कर्मचारी तसेच जिल्हा परिषदचे व शासनाचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker