ताजे अपडेट

जुनोनीत टेंभूचा कालवा फोडला;२३ जणांवर गुन्हा दाखल

 

सांगोला : जेसीबीच्या सहाय्याने कालवा फोडून तलावात सोडल्याप्रकरणी पाणी सांगोला तालुक्यातील जुनोनीतील २३ जणांवर सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे म्हणून टेंभू योजनेचे पाणी (ता. भा आटपाडी) येथून कालव्यातून सोडण्यात आले होते. नियमाप्रमाणे हे पाणी शेवटच्या भागात कडलास, बुरुंगेवाडी, वाटंबरे, राजुरी येथे सुरू ची होते. कालवा नंबर १२/७०० किमी (आऊटलेट) येथे देखरेखीसाठी आटपाडी पाटबंधारे विभाग येथील, कर्मचारी बाळासाहेब रामचंद्र जाधव यांची नेमणूक केली होती. शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व स्कॉर्पिओ गाडीतून (एमएच ४६ एन ८२८१) वीस ते पंचवीस जणांचा जमाव कालव्याजवळ आला. त्यांनी जेसीबीच्या साह्याने कालव्याचे विनापरवाना आउटलेट उघडून पाणी सोडून दिले आहे. या प्रकरणी विकास श्रीराम, शिवाजी काळे, शिवाजी होनमाने, दगडू होनमाने सचिन पाटील (सर्व रा. जुनोनी ता. सांगोला) यांच्यासह इतर दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालवा फोडण्याची माहिती मिळाल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन फोडलेला कालवा जेसीबीच्या सहाय्याने बुजवण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker