गुन्हेगारीताजे अपडेट
Trending

राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने सांगोला शहरात छापा टाकून २५ लाखाचा गुटखा पकडला

चार जणावर गुन्हा दाखल

सांगोला : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता पथकाने सांगोल्यात गोडावून व पिकअपवर छापा टाकून २५ लाख रुपयांचा गुटखा शिताफीने पकडला. यावरून बंदी असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे या घटनेने सिद्ध झाले. हा गुटखा नेमकी कोणत्या तस्कारांकडे पोहचणार होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईतील अन्न व औषध प्रशासन व दक्षता पथकाला सांगोल्यातील गुटख्याची खबर मिळते. मात्र, याबाबत अन्न व औषध प्रशासनासह पोलिस यंत्रणा अनभिज्ञ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात रात्री उशिरा भा.द.वि.स कलम 34, 188, 272, 273 व 328 चे उल्लंघन केल्याने , वाहन चालक/मालक संभाजी अमसिध्द बन्ने , वय – 40 वर्षे, रा. कमलापुर, ता. सांगोला, जि. सोलापूर, साठा मालक दिलीप रामचंद्र मस्के , रा. मस्के कॉलनी, सांगोला, जि. सोलापूर, पुरवठादार बिपीन तेजवाणी , रा. अथणी, कर्नाटक व खरेदीदार प्रशांत गांधी , रा. बारामती, पुणे यांचे विरुध्द वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोल्यात राजरोसपणे प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त राहुल खाडे आणि मुंबईच्या दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास इंगवले यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, कोल्हापूर विभागाचे दक्षता अधिकारी महेश मासाळ, सांगली विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी, कोल्हापूर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे, सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांच्या पथकाने सांगोल्यात कारवाई केली. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा एम एच ४५ ए.एफ.२३०७ पिकअप जप्त केला. तसेच गुटख्याची साठवणूक केलेल्या गोडावूनमधून गुटखा जप्त केला.
अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या पथकाने या कारवाईत ७ लाख २० हजार रुपये किमतीचा ३० पोती विमल पान मसाला, १ लाख ८० हजार रुपये किमतीची ६ पोती व्ही वन सुगंधी तंबाखू, ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचा १२ बॉक्स आर एम. डी. पान मसाला, २ लाख ८८ हजार रुपये किमतीची ६ बॉक्स एम. सेंटेड तंबाखू, ३ लाख ८४ हजार रुपये किमतीचा १६ पोती सुपर जेम मसाला, ४८ हजार रुपये किमतीची ८ पोती एस. पी. ९९९ सुगंधित तंबाखू, गोडावून मधील ५ लाख ३१ हजार ५४४ रुपयांचा गुटखा, ५ लाख रुपये किंमतीचे पिकअप असा ३० लाख ८३ हजार ५४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

                                                        राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असतानाही नवनवी शक्कल लावून छुप्या मार्गाने प्रतिबंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक होत असते. या कारवाईमुळे लगतच्या राज्यातून होणाऱ्या अवैध गुटखा तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, याबाबत अन्न व औषध प्रशासनासह पोलिस यंत्रणा अनभिज्ञ आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गुटखा तस्करीमागील मोठे मासे शोधून काढणे हे आव्हान आता पोलीसांपुढे असल्याचे बोलले जात आहे. गुटखा विक्रेत्यांकडे तो कोण आणून देतो, गुटखा तस्कर कोण? या खोलात जाण्याचे धाडस अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी का? करीत नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker