आरटीआय न्युज स्पेशलताजे अपडेट
Trending

सांगोल्यात आचारसंहितेची ऐशी तैशी “एक बार फिर से मोदी सरकार”ची चित्रे भिंतीवरती- दुकानावरती

सांगोला : लोकसभा निवडणूक जाहीर होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी सांगोला शहरातील अनेक भागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी  एक बार फिर से मोदी सरकार असा छाप असलेला चित्र अनेक ठिकाणी सार्वजनिक जागेवर,खाजगी मालमत्तेवर दर्शनी बाजूवर लोकांना दिसावीत यासाठी छापण्यात आलेली होती, सदरील रंगीत छाप्यावरती भाजपचे राष्ट्रीय चिन्ह कमळ व त्याखाली  एक बार फिर से मोदी सरकार असे लिहिले होते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सदरील भाजपचे चिन्ह असलेले रंगीत छाप्याचे चित्र झाकून ठेवणे आवश्यक असताना सांगोला शहरातील काही भागांमध्ये सदरील रंगीत छाप्याचे ” एक बार फिर से मोदी सरकार”चे रंगीत चित्र अजूनही दिसून येत असल्याने सांगोला शहरात आदर्श आचारसंहितेचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.                                                                                                                       विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे याकरिता विशेष फिरते पथक फिरत असून या पथकाचे देखील याकडे लक्ष गेले नाही का?असा सवाल या निमित्ताने सांगोला शहर वासियातून व्यक्त केला जात आहे. आदर्श आचारसंहितेमध्ये कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याचे किंवा त्या पक्षाच्या चिन्हाचे, नावाचे बॅनर हे झाकून ठेवावे असे निवडणूक आयोगाचे निर्देश असताना देखील सांगोला शहरात मात्र “एक बार फिर से मोदी सरकार”चे कमळ चिन्ह सहित असलेले चित्र सर्रासपणे दिसून येत असल्याने आदर्श आचारसंहितेची सांगोला शहरात ऐशी तैशी झाल्याचे पहावयास मिळत आहे.                                                                               याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही पक्षाचे चिन्ह,पक्षाच्या नेत्याचे नाव बॅनर असेल त्या ठिकाणी प्रतिबंधित कारवाई करून यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांतून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker