ताजे अपडेट

लोकशाही बळकटीकरणासाठी नवमतदारांचा सहभाग महत्वाचा

सोलापूर विद्यापिठात मतदार जागृती कार्यक्रम संपन्न

 

सोलापूर  : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवमतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात पोस्टर, बॅनर व सेल्फी पॉईंट अशा विविध माध्यमातून मतदान जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सांगितले.

        सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित लोकशाहीच्या निवडणूक उत्सव कार्यक्रम प्रसंगी श्री ठोंबरे बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ योगिनी घारे, एन.एस.एस. विभागाचे प्रमुख डॉ राजेंद्र वडजे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे प्रमुख डॉ. गौतम कांबळे,प्रा.अंबादास भास्के, प्रा. बाळसाहेब मागाडे, प्रा. तेजस्विनी कांबळे, प्रा. मंडलिक यांच्यासह विविध विभागाचे प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

               जिल्ह्यामध्ये सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या निवडणूक साक्षरता क्लब, जिल्हा निवडणूक कार्यालय व वर्षीप अर्थ फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून नव मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती विषयक कार्यक्रमांची माहिती एन.एस.एस. विभागाचे डॉ राजेंद्र वडजे आणि जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार यांनी यावेळी दिली. तसेच निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानीत करण्यात आले.

  निवडणूक साक्षरता क्लबच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येत असेलल्या मतदान जनजागृतीच्या कार्याविषयी कुलसचिव योगिनी घारे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच यापुढे ही मतदान जनजागृतीच्या कार्यात विद्यापीठाचे संपूर्ण सहकार्य असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.निवडणुकीच्या उत्सवात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी उपस्थितांनी संवाद साधला. तसेच विद्यापिठाच्या पत्रकारिता विभागातील टीव्ही व रेडीओ स्टुडीओ मधूनही मतदान जनजागृती करण्यात येणार आहे.

 

**

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker