ताजे अपडेटरेल्वे
Trending

दादर-सातारा -दादर एक्सप्रेस रेल्वे दररोज सोडण्याची अशोक कामटे संघटनेची मागणी

 

सांगोला : सातारा -दादर -सातारा 11027,11028 या एक्सप्रेस रेल्वेस दररोज सुरू करण्याची आग्रही मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दोन महिन्यापासून संघटनेच्या मागणीनुसार या रेल्वेचा विस्तार सातारपर्यंत करण्यात आला. ज्या दिवसापासून ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली त्या दिवशीपासून या रेल्वेस कवठेमंकाळ, ढालगाव, जत रोड ,म्हसोबा डोंगरगाव ,सांगोला या स्टेशनवरून उत्स्फूर्तपणे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे . आठवड्यातील तीनही दिवस या रेल्वेस आरक्षणाकरता वेटिंग सुरू असून सर्वसाधारण डब्यामध्ये देखील तुडुंब गर्दी प्रवाशांची होत आहे, या रेल्वेस आणखीन दोन ते तीन जनरल डबे जोडावेत,साहजिकच रेल्वेच्या उत्पन्नामध्ये मोठी भर पडत आहे. त्याचबरोबरिनी प्रवाशांची ही मोठी सोय झालेली आहे ,सदरची रेल्वे दररोज धावण्याकरता रेल्वे प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी सातत्याने अशोक कामटे संघटनेने रेल्वे विभागाकडे सातत्याने केली आहे. या निवेदनाच्या प्रती रेल्वे बोर्ड दिल्ली, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर यांनाही देण्यात आलेले आहेत. तरी येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी व सुट्टीचा हंगाम लक्षात घेता प्रशासनाने या रेल्वेस कायमस्वरूपी नियमित( दररोज) धावण्याकरता प्रशासनास आदेश द्यावेत अशी मागणी कवठेमंहाकाळ ढालगाव जत रोड डोंगरगाव येथील नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्यासह प्रवासी वर्गातून होत आहे.

कोरोनापूर्वी विजापूर- मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस धावत होती ती तीन वर्षापासून बंद करण्यात आली त्याचा रेक उपलब्ध असून उर्वरित तीन दिवसाकरिता सातारा- दादर-सातारा या मार्गावर हा रेक वापरल्यास आठवड्यातील संपूर्ण दिवस मुंबईला जाण्याकरता मिरज पासून सांगोल्यातील सर्व स्टेशन परिसरातील प्रवाशांना जाण्याकरिता सुरक्षित ,अल्प खर्चात मोठी सोय होणार आहे तरी रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्न लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा याकरिता कामटे संघटना प्रयत्नशील आहे.                     श्री नीलकंठ शिंदे सर, संस्थापक:- शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना ,सांगोला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker