आरटीआय न्युज स्पेशल

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मी सदैव कटिबध्द- खासदार प्रतिभा धानोरकर

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

अमृतसर येथील 9 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचा थाटात समारोप.

मी सदैव ओबीसी समाजाच्या पाठीशी असून त्यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी मी सदैव कटिबध्द असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अमृतसर येथे आयोजित 9 व्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात केले.

7 ऑगस्ट रोजी अमृतसर येथे ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसी बांधवांच्या मागण्यांवरील चर्चा संदर्भात या अधिवेशनात विविध विषयासंदर्भात ठराव घेण्यात आले. या वेळी खासदार धानोरकर म्हणाल्या की, प्राण्यांची जनगणना होते परंतु आपली जातनिहाय जणगनना न होणे ही बाब चुकीची आहे. ओबीसी समाजाने आज जागृत राहणे गरजेचे असून जातनिहाय जणगननेकरीता माझा लढा कायम राहणार आहे.

ओबीसी समाजाच्या नॉन क्रिमीलेअर ची मर्यादा 15 लाख करावी यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. तसेच ओबीसी समाजाचा एक घटक म्हणून मी सदैव ओबीसी समाजाच्या पाठीशी राहुन वेळेप्रसंगी आंदोलन देखील करण्यास मी तैयार राहील.

यावेळी मंचावर मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष  हंसराज अहिर, ओबीसी चे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, माजी मंत्री महादेवराव जानकर, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार सुधाकर अडबाले, आमदार परिणय फुके, अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker