आपला जिल्हा

मुल व पोभुर्णा तालुक्यामधील 15 गावा तील मेंढपाळ यांना त्यांच्या गायी चारण्यासाठी राखीव जागा द्या – डॉक्टर अभिलाषा गावतुरे

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

अन्यथा गोमातेच्या चाऱ्या साठी तिव्र आंदोलन…

       मुल व पोभुर्णा तालुक्यातील बेंबाळ,बाबराला ,कोरंबी, नवेगाव भूजला ,चक दुगाळा, घोसरी , लालहेटी ,थेरगाव, नांदगाव , भंजाळी,पिंपरी दीक्षित ,माल दुगाला, रेगडी येरगाव ,येसगाव या परिसरांतील गोलकर व धनगर समाजा पुढे वनविभागाच्या चराई संबंधांतील अडेलतट्टू धरणामुळे त्याच्या गायी, म्हशी, बकरी व मेंढी चराईचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून चाऱ्या अभावी शेकडो जनावरे दगावण्याची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

        सदर परिसरातील गोलकर व धनगर समाजाचे लोंक शेकडो वर्षा पासुन गायी, म्हशी , बकरी व मेंढी पाळून आपले उदरनिर्वाह करत आले आहे. आधी वनक्षेत्रावरच चराई केली जात होती परंतु गेल्या काही दशकात वनविभागाच्या आडमुट्टेपणा मुळे सदर जनावरांच्या चराईची स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. आवश्यक नसतांना मोठ्या प्रमानावर वन उद्यान व वृक्षलागवडीच्या नावा खाली रोपवनाची निर्मीती करून चराईचे क्षेत्र वनविभागे नष्ट केले आहे. नियोजन बद्ध पद्धतीने वनविभागाने याबाबी कडे वेळीच लक्ष दिले असते तर आज चराईची समस्या निर्माण झाली नसती असे नागरिकांचे म्हनने आहे.

       एकीकडे राज्याचे वनविभाग संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमाने लोकसहभागातून वनाचे शास्वत विकास करण्या करिता मोठ्या प्रमाणावर योजना राभबवीत आहे तर दुसरी कडे गाय ही माता असून गोमातेचा रक्षणा करिता मोठ्या प्रमानावर प्रयत्नरत असल्याचे चित्र राज्यात असतांना पोभुर्णां वनपरिक्षेत्रातील वन अधीकारी मात्र या बाबीच्या विपरीत वर्तन करत असल्याचे दिसुन येत आहे.

स्थानिक मेंढीपाळ यांनी वारंवार विनंती करुन ही वनविभागाने त्यांची दखल घेतली नसल्याने आदिवासी दिनाच्या औचित्यावर डॅाक्टर अभीलाषाताई गावतुरे यांच्या सह शिष्टमंडळाने पोभुर्णा वनपरिक्षेत्र अधीकारी यांची भेट घेउन सदर गावातील गोलकर व धनगर समाजाच्या गायी, म्हशी, बकरी व मेंढी चराई बाबत चर्चा करून वनविभाने चराई कुरण निर्माण करने ही वनविभाची जबाबदारी असुन चराई कुरण निर्माण करण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे.

गाय ही या देशात माता म्हनून पुजली जाते तीला चरा उपलब्ध करून देने हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य असायला पाहिजे असे असतानाही वनविभाग गायीच्या चाऱ्या करिता बंदी घालत आहे हे दुर्देवी असून त्वरित वनविभागे मुल व पोभुर्णा परिसरातील गाय, म्हैस, बकरी व मेंढी करिता चराई करीता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी व मोठ्या प्रमानावर चराई कुरण निर्माण करावे अन्यथा गोमातेच्या रक्षणा करिता तिव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा ईशारा दिला आहे.

    यावेळी शिष्टमंडळा मध्ये डॉक्टर अभिलाषा गावतूरे यांच्यासह बेंबाळ उपसरपंच देवा भाऊ ध्यानबोईवार ,काँग्रेस किसान सेल चे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील वाढई,गोलकर समाजचे अध्यक्ष मंगरूजी कुरिवार ,पद्माकर आऊलवार ,पोचूजी बिरमवार प्रशांत पुठावार ,धनराज करेवार ,नारायण कुरीवार गजानन डंकरवार ,तिरुपती शिंदे ,सुहास वाढई विक्रम भाऊ गुरनुले आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker