ताजे अपडेट
Trending

सोलापूर-सांगोला रोडवर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; 2 जागीच ठार तिघे गंभीर जखमी

अपघातातील क्रुजर जेसीबीच्या सहाय्याने काढली 

सांगोला : सोलापूर मिरज या महामार्गावर मंगळवेढ्यानजिक आंधळगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले तर या अपघातात वाहन चालक, दोन लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत.

मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आंधळगाव जवळ पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला ट्रेलर थांबला होता त्याला पाठीमागून क्रुझर जीपने जोराचे धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. क्रूजर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून KA 27 बी 81 88 असा या गाडीचा नंबर आहे.

अपघात इतका भीषण होता की क्रुझरचे समोरचा भाग त्या ट्रेलरच्या खाली घुसला होता. शेवटी जेसीबी बोलावून क्रुझरला ओढून जखमी ड्रायव्हर आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले.

अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील 108 क्रमांक ॲम्बुलन्सचे डॉक्टर वैभव जांगळे व पायलट सुरज कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली. मयत हे कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांचे अध्याप ही नावे समोर आलेली नाहीत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker