विज्ञान/तंत्रज्ञान

मस्क लाँच करणार Xmail  

इट्स कमिंग, जीमेलच्या वर्चस्वाला आव्हान

टेस्ला, स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे मालक एलॉन मस्क यांनी ‘XMail’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे गुगलच्या फ्लॅगशिप जीमेल सेवेला स्पर्धा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक्स अभियंता नेट मॅकग्रेडी यांच्या पोस्टला उत्तर देताना मस्क यांनी ही घोषणा केली.

नेट मॅकग्रेडीनी लिहिले, ‘आपण Xmail कधी बनवणार?’ त्याला उत्तर देताना मस्क यांनी लिहिले, (इटस कमिंग) ‘ते येत आहे.’ तथापि, मस्क यांनी अद्याप XMail च्या लॉन्च तारखेबद्दल किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही तपशीलाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

जीमेल बंद झाल्याच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर मस्कने ही घोषणा केली

एलॉन मस्क यांनी ‘एक्समेल’ लॉन्च करण्याची घोषणा अशा वेळी केली आहे जेव्हा गुगलचा ईमेल प्लॅटफॉर्म जीमेल सेवा बंद झाल्याच्या खोट्या बातम्या व्हायरल होत होत्या. मात्र, जीमेलने हे वृत्त फेटाळून लावले आहे. जीमेलने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून X वर लिहिले होते, ‘Gmail is here to stay.’

अफवा Gmail च्या ईमेल सारख्या दिसण्यासाठी तयार केलेल्या बनावट प्रतिमेपासून सुरू झाली. कंपनी या वर्षाच्या अखेरीस जीमेल बंद करण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा फोटो X सह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Gmail बंद झाल्याबद्दलच्या बनावट व्हायरल पोस्ट?

Gmail बंद केल्याबद्दलच्या बनावट व्हायरल पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘जगभरातील लाखो लोकांना जोडल्यानंतर, अखंड संप्रेषण सक्षम करून आणि अगणित कनेक्शन्स वाढवल्यानंतर, Gmail चा प्रवास संपुष्टात येत आहे.’ त्यात पुढे म्हटले आहे की, ‘Gmail 1 ऑगस्ट 2024 पासून अधिकृतपणे बंद होईल, ज्यामुळे तिची सेवा समाप्त होईल. याचा अर्थ Gmail यापुढे ईमेल पाठवण्यास, प्राप्त करण्यास किंवा संग्रहित करण्यास समर्थन देणार नाही.’

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker