विज्ञान/तंत्रज्ञान
Trending

जिओ  लवकरच  लॉन्च करणार 5G स्मार्टफोन

किंमत 9,000 पेक्षा कमी,क्वालकॉम चिपसेटसह कंपनीचा पहिला फोन 

मुंबई : क्वालकॉमने पुष्टी केली आहे की ते नवीन 5G सक्षम जिओ फोन लॉन्च करण्यासाठी रिलायन्स जिओसोबत काम करत आहे. ही पहिलीच वेळ असेल की जिओ फोन क्वालकॉम चिपसेटसह येईल. मनीकंट्रोलने एका अहवालात ही माहिती दिली आहे.

क्वालकॉमने सांगितले की भारतात या स्मार्टफोनची किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी असेल. ऑगस्ट 2022 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, मुकेश अंबानी यांनी 5G उत्पादने विकसित करण्यासाठी रिलायन्स जिओ आणि क्वालकॉम यांच्यातील भागीदारीची घोषणा केली होती.

क्वालकॉमची भारतीय R&D टीम 5G चिपसेट विकसित करणार :

क्वालकॉमचे SVP आणि हँडसेटचे जनरल मॅनेजर क्रिस पॅट्रिक म्हणाले, ‘आम्ही नवीन चिपसेटसह परवडणारा स्मार्टफोन शोधत असलेल्या ग्राहकांना संपूर्ण 5G अनुभव देऊ इच्छितो. आम्ही 4G आणि 5G मधील संक्रमणावर खूप लक्ष केंद्रित केले आहे. आमची भारतीय संशोधन आणि विकास (R&D) टीम नवीन चिपसेट विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.

क्वालकॉमची भारतात 4 संशोधन आणि विकास केंद्रे :

यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये, अमेरिकन बहुराष्ट्रीय चिप निर्मात्याने चेन्नईमध्ये डिझाईन सेंटर उभारण्यासाठी ₹177.27 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. सध्या भारतात क्वालकॉमचे संशोधन आणि विकास केंद्रे बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि नोएडा येथे आहेत.

जिओने 4 महिन्यांपूर्वी 4G स्मार्ट फीचर फोन लॉन्च केला :

रिलायन्स जिओने भारतीय मोबाइल काँग्रेस 2023 मध्ये 4 महिन्यांपूर्वी ‘जिओ फोन प्रायमा 4G’ हा फीचर फोन लॉन्च केला होता. जिओ फोन प्रायमा 4G च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1800mAh बॅटरी आणि 23 भाषांचा सपोर्ट आहे. हा फोन KaiOS वर चालतो, जो फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ओपन-सोर्स ऑपरेटिंग सिस्टम आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker