आरटीआय न्युज स्पेशलताजे अपडेट
Trending

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर (टाऊन हॉल) सभागृहाचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

आ. ॲड. शहाजीबापू पाटील यांनी स्वतः लक्ष घालून सभागृह चांगल्या दर्जाचे व्हावे याकरिता नगरपालिका प्रशासनास सूचना द्याव्यात शहर वासियांची अपेक्षा

 

सांगोला  : सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम गेल्या काही महिन्यापासून नगरपालिकेच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधी मधून सुरू असून सदरील काम करताना कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा व सुमार आहे. या कामाकरिता आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी शासनाकडून तब्बल दीड कोटी रुपयाचा निधी दिलेला असताना सदरचे काम प्लान इस्टिमेटप्रमाणे केलेले नाही, कामात अनेक त्रुटी आहेत. या सभागृहातील नवीन टाकलेल्या खुर्च्या या अतिशय खराब दर्जाच्या असून सदरील कार्यालयात मागील तीन दिवसांमध्ये झालेले कार्यक्रमात तब्बल 30 ते 40 खुर्च्या मोडलेल्या असून सदरच्या खुर्च्या या प्लॅन इस्टिमेटप्रमाणे नाहीत.सभागृहातील दोन्ही बाजूस वरून कापड लावलेले आहे.या सभागृहातील खिडक्याच्या अनेक काचा देखील फुटलेल्या अवस्थेत आहेत. खाली असलेल्या फरशीवर पडलेले रंगाचे डाग जसेच्या तसे अवस्थेत आहेत. स्टेजच्या वरील बाजूस काहीही काम केलेले नसून फक्त रंगकाम केलेले आहे, लाईटच्या टयुबा लटकलेल्या अवस्थेत आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करताना कामाचा दर्जा हा अतिशय सुमार दर्जाचा असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरने सदरील काम हे चांगल्या दर्जाचे व्हावे याकरिता दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

   

सदरील कामांमध्ये प्लॅन इस्टीमेट व प्रत्यक्ष काम यात मोठी तफावत आहे.सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या सभागृहात अनेक शासकीय कार्यक्रम, मोठेलहान कार्यक्रम, लग्न सोहळे, मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात, त्या दृष्टीने या सभागृहाचे सुशोभीकरण करणे आवश्यक होते. या करिता आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी शासनाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणून नगरपालिके मार्फत हे काम सुरू केलेले होते,परंतु सदरील सभागृहाचे काम अतिशय निकृष्टपणे केले गेल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.सदरील काम करताना कामाचा दर्जा हा एवढा निकृष्ट असताना नगरपालिकेचे संबंधित अभियंता नेमके काय?करत होते, असाही सवाल या निमित्ताने नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे. या सभागृहाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे,याकरिता आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी स्वतः लक्ष घालून हे सभागृह चांगल्या दर्जाचे व्हावे याकरिता नगरपालिका प्रशासनास सूचना द्याव्यात अशी अपेक्षा सांगोला शहर वासियांतून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker