ताजे अपडेट

नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा जाहीर; अधिसूचना जारी

'या' गावांतून जाणार हा महामार्ग

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार या महामार्गास राज्य महामार्ग (विशेष) क्रमांक १० म्हणून घोषित करण्यात आला आहे.या अंतिम आराखड्यानुसार कोकणातील खालील गावातून हा महामार्ग जाणार असून लवकरच भूमी अधिग्रहण करण्याचे काम चालू करण्यात येणार आहे.

             सांगोला तालुक्यातील मेथवडे, संगेवाडी,मांजरी,देवकतेवाडी,चिचोली, सांगोला,एखतपूर,कमलापूर,यलमार मंगेवाडी,अजनाळे,चिनके,वझरे,बलवडी,नाझरे,चोपडी,बंडगरवाडी,सोमेवाडी  या गावातून हा महामार्ग जाणार आहे.

‘शक्तिपीठ’ महामार्ग नागपूर – गोव्या दरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवी येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.

११ हजार हेक्टर जागेची गरज

समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूसंपादन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.

 

 

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker