ताजे अपडेट

एस.टी.च्या वेगाला लक्ष्मीची साथ दुपटीने वाढले महिला प्रवासी, उत्पन्नात १,६०५ कोटींची भर

मुंबई: एस टी महामंडळाने १७ मार्च २०२३ रोजी महिला सन्मान योजना लागू केली. महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो.

एसटीच्या वेगाला लक्ष्मीच्या साथीने दुपटीने वाढले महिला प्रवासी, उत्पन्नात १,६०५ कोटींची भर पडली आहे.कित्येक वर्षे भरवशाची वाटणारी लालपरी सध्या महिलावर्गामध्ये अधिक लोकप्रिय झाली आहे. त्यातच महिला सन्मान योजनेमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून एसटीला लक्ष्मी पावली आहे. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात तब्बल एक हजार ६०५ कोटींची भर पडली आहे. महामंडळाने १७ मार्च २०२३ रोजी महिला सन्मान योजना लागू केली. महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमधून अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतो.

५६ कोटी लाभार्थी

१७ मार्च २०२३ पासून फेब्रुवारी २०२४ पर्यंत महिला सन्मान योजनेच्या लाभार्थीची संख्या ५५ कोटी ९९ लाख ५७ हजार १६१ इतकी झाली आहे.सवलत मिळण्यापूर्वी दीड ते दोन कोटी महिला बसने प्रवास करत होत्या आजघडीला त्यांची संख्या पाच कोटींपर्यंत वाढली आहे. गेल्या वर्षभरात एकूण ५५ कोटी ९९ लाख ५७ हजार१६१ महिला प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. गेल्या वर्षभरात महिला सन्मान योजनेंतर्गत शासनाने प्रतिपूर्ती रकमेपोटी एसटीला तब्बल एक हजार ६०५ कोटी रुपये अदा केले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker