ताजे अपडेट

महादेव जानकर महायुतीच्या गोटात

शरद पवारांना धक्का;महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा

मुंबई : रासप नेते महादेव जानकर यांच्या पक्षाला महायुतीकडून एक जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीत महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळ्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला असून पवार त्यांना माढा येथून उमेदवारी देण्याच्या तयारीत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून छोट्या पक्षांना विचारात घेतलं जात नाही, अशी नाराजी दर्शवणारे रासप नेते महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांची भेट घेतली होती. त्यामुळे महादेव जानकर महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढतील, अशी चर्चा होती. या सर्व चर्चानंतर आता राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली. महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker