आरटीआय न्युज स्पेशलताजे अपडेट
Trending

आधीच रस्त्यांची दुरावस्था… त्यात पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामामुळे रस्ता अधिकच झाला खराब !!

सांगोला शहरातील रस्त्यांची दुरावस्था तात्काळ दुरुस्त करावी नागरिकांतून मागणी

    👆👆👆खरेदी विक्री संघासमोर नेहरू चौक परिसर

👆👆👆छत्रपती शिवाजी महाराज चौक

सांगोला :शहरातील खराब रस्ते त्यात नगरपालिकेने पाणीपुरवठयाच्या पाइप लाइन साठी रस्त्याच्या बाजूस,मधोमध खोदलेली चारी व्यवस्थित पणे न मुजवल्याने सांगोला शहरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली असून याचा मोठा त्रास नागरिकांना होत आहे.सांगोला शहरातील कचेरी रोड, सनगर गल्ली,छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर या भागामध्ये नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूस, आणि मध्ये चार खोदून नुकतीच पाइप लाइन टाकलेली असून खोदलेल्या चारीचे खड्डे यामुळे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.

     रस्त्यावरती खड्डेच खड्डे व मातीचे ढिगारे पाहावयास मिळत असून यामुळे सांगोला शहरातील नागरिकांना प्रचंड धुळीचा व वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे काही वाहनचालक पडले देखील असून या प्रकारामुळे सांगोला शहर वासियातून संताप व्यक्त केला जात आहे.

     गेल्या काही वर्षापासून सांगोला शहरातील अंतर्गत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असताना त्यात नगरपालिकेने खोदलेली चारी यामुळे यात अधिकच भर पडलेली आहे. नगरपालिकेने खोदलेली चार मुजवताना रस्त्याच्या लेव्हलप्रमाणे न मुजवता मातीचे ढिगारे ठेवल्याने याचा फटका व त्रास नागरीकांना होत आहे.नगरपालिकेने खोद लेल्या चारीचे मातीचे ढिगारे रस्त्याच्या लेव्हल प्रमाणे करून रस्त्याची ही झालेली दुरावस्था तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी सांगोला शहरातील नागरिकांतून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker