ताजे अपडेट

दुर्देवी घटना; ऊस तोडणी कामगाराच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस ट्रकची पाठीमागून धडक,तीन महिलांसह चौघेजण जागीच ठार

सांगोला : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ऊसतोडणी कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॉलीमधील तीन महिलांसह चौघेजण जागीच ठार झाले तर इतर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कवठेमंकाळ व मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत व जखमी मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील ऊस तोडणी मजूर असल्याचे माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास नागपूर -रत्नागिरी महामार्गावरील नागज फाट्याजवळ घडला. मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर (३० रा. शिरनांदगी ता मंगळवेढा), जगमा तम्मा हेगडे (वय ३५), दादा आप्पा ऐवळे (वय १७), निलाबाई परशुराम ऐवळे (सर्वजण रा.चिखलगी ता मंगळवेढा) अशी मृत मजूरांची नावे आहेत.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी व चिखलगी गावातील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी शिरोळ जि सांगली कारखान्यावर येथे गेले होते. ऊस तोडणीचा हंगाम संपल्यामुळे सोमवारी मृत व जखमी शिरोळ येथून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून गावी परत निघाले होते. वाटेत मिरजपासून पुढे सांगोल्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेत मंगळवेढा तालुक्यातील ऊसतोडणी मजुरासह चौघेजण जागीच ठार झाले तर इतर १० जण जखमी झाले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker