आरटीआय न्युज स्पेशल

10 ऑगस्ट ला नागपूर विधानभवनावर फडकणार स्वतंत्र विदर्भाचा झेंडा 

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

क्रांतीदिनी महाराष्ट्रवादी चले जाव चा जयघोष

पत्रपरीषदेत विराआंस अध्यक्ष वामनराव चटप यांची माहीती

चंद्रपूर. मागील 119 वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी करून बारा वर्षापासून सतत जनआंदोलन करून विदर्भ राज्य आंदोलन समिती ने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे. आता विदर्भ राज्य आंदोलन समिती 10 ऑगस्ट 2024 ला नागपूर विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवणार आहे. आंदोलनापूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे 10 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता एकत्र येणार असून समिती चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवन(संविधान चौक) पर्यत लॉंगमार्च ‌काढून विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविणार आहे अशी माहीती विदर्भ राज्य आंदोलन समिति चे अध्यक्ष वामनराव चटप यांनी बुधवारला श्रमिक पत्रकार भवन मध्ये आयोजित पत्रकार परीषदेत दिली. या आंदोलना 11 तालुक्यातले जवळपास 5000 लोक सहभागी होणार आहेत.

केंद्रात सत्तेवर असणा_या भाजप सह अनेक पक्षांनी विरोधी पक्षात असतांना स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आंदोलना में भाग घेतला होता परंतु सत्तेत येताच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माति बाबतीत विदर्भातील जनतेच्या तोंडा पाने पुसली आहे. लोकसभा निवडणूकीत वचन न पाळलेल्या केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षाला विदर्भातील जनतेने विदर्भातील लोकांची दिशाभूल केल्याबद्दल जरब बसविली आहे. आता सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य दिले नाही तर आगामी काळात विधानसभा निवडणूकीत विदर्भातील जनता याचे चोख उत्तर देणार असेही चटप म्हणाले.

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आणि विदर्भातील नागरिकावरील अन्याय संपविण्याच्या दृष्टीने नव्या केंद्र सरकार ला इशारा देण्यासाठी महाराष्ट्रवादी चले आओ चा नारा देत समिती पुन्हा रणशिंग फुकणार आहे. कुठल्याही परिस्थितीत 10 ऑगस्ट 2024 ला विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर येथे विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे असेही म्हणाले.

आंदोलनात केंद्र सरकारने शेतक_यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी तात्काळ रद्द करावे, अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, साप चावून मरणा_या व्यक्तीस मदत मिळावी, राज्यात दुष्काळी परिस्थिती मुळे पिक विमाधारक शेतक_यांना तात्काळ मदत द्यावी, विदर्भात स्मार्ट प्रीपेड मीटर कुठेही लावू नये, आष्टी ते सुरजागड कांक्रीट रस्ता बांधकाम ला राज्य सरकारने त्वरित मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करण्यात यावी, बल्लारशहा सुरजागड रेल्वे मार्गास केंद्र सरकारने तात्काळ नंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून ‌द्यावा अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे चटप यांनी सांगीतले.

पत्रपरीषदेत विराआंस अध्यक्ष एड. वामनराव चटप, पूर्व विभाग अध्यक्ष अरूण केदार, मुकेश मासुरकर, डा. रमेश गजबे, किशोर दहेकर, कपिल इद्दे, मितीन भागवत, अंकुश वाघमारे, गोपी मित्रा, अरूण वासलवार, अनिल दिकोंडवार, मुन्ना आवळे आदि उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker