रोजगार/शिक्षण

गुणवंत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात पदार्पण करून देशाचे भविष्य घडवावे- हंसराज अहीर

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

डॉ. गंगाराम अहीर चॅरीटेबल ट्रस्टद्वारा शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

चंद्रपूरः-गुणवंत विद्यार्थी देशाचे भवितव्य असून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करीत भविष्यात देशाची सेवा करण्यासाठी स्वतःला सिध्द करावे. आजच्या सन्मानाला पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी अविश्रांत परीश्रम घेत गुणवत्ता संपादन केल्याने त्यांच्या श्रमाचे मोल जपण्यासाठी या गुणसंपन्न विद्याथ्यांचा सन्मान करून भावी उज्ज्वल यश लाभावे यासाठी प्रोत्साहीत करण्याची भावना या कार्यक्रमामागे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

इयत्ता १०वी व १२वी परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा डॉ. गंगारामजी अहीर चॅरीटेबल ट्रस्टद्वारा, कमल स्पोर्टीग क्लबच्या वतीने चंद्रपुरातील आयएमए सभागृहात दि. २८ जुलै २०२४ रोजी पार पडला त्याप्रसंगी हंसराज अहीर बोलत होते. याप्रसंगी मंचावर आ. किशोर जोरगेवार, हरीश्चंद्र अहीर, माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, डॉ. राजू सैनानी, प्राचार्य डॉ. अनिल चिताडे, भाजपा नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, मधुसूदन रूंगटा, कमल स्पोटींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, दामोदर मंत्री, अनिल फुलझेले, डॉ. रजनीकांत भलमे, रवींद्र गुरूनुले, शामल अहीर, हर्षवर्धनः अहीर, मायाताई उईके, दिनकर सोमलकर, शिलाताई चौव्हाण, चंद्रकलाताई सांयाम, डुग्नाई, बदना संतोषवार, शालु कन्नोजवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा देवून अहीर कुटूबियांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरवपुर्ण शब्दामध्ये उल्लेख करून हंसराज अहीर यांचे कार्य सर्व घटकांना न्याय व सन्मान देणारे असल्याचे सांगीतले. या सन्मानामधुन विद्यार्थी नवी उर्जा घेवून शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करतील असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुवीर अहीर यांनी केले. यावेळी डॉ. राजु सैनानी, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, खुशाल बोंडे यांनी विद्याथ्यांना उद्देशुन समयोचित विचार व्यक्त केले.

यावेळी हंसराज अहीर व उपस्थित मान्यवर अतिथीच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमास राजू घरोटे, विनोद शेरकी, गौतम यादव, पुनम तिवारी, राजवीर चौधरी, अजेय अहीर, आदित्यवर्धन अहीर, शाम कनकम, प्रदिप किरमे, दिनकर सोमलकर, राम हरणे, संजय खूनके, श्रीकात भोयर, राहुल गायकवाड, मयुर भोकरे, प्रणय डंबारे, शिवाजी वाकोडे, प्रवीण चुनारकर, रेणुकाताई घोडेस्वार, प्रा. रवी जोगी, राहुल सुर्यवंशी, चेतन शर्मा, कृपेश बडकेलवार, विक्की लाडसे, सिंधुताई राजगुरे, सुदामा यादव यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक राहुल बनकर यांनी तर आभार राजवीर चौधरी यांनी मानले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker