आरटीआय न्युज स्पेशल

वे.को.ली ब्लास्टीग मुळे वरोरा तालुक्यातील मार्डा गावातील झालेल्या घराची नुकसान भरपाई द्या :- युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक.

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

उपविभागीय अधिकारी यांना आम आदमी पार्टी वरोरा चे निवेदन

चंद्रपुर:दिनांक 26/07/2024 रोजी आम आदमी पार्टी वरोरा च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 23 जुलै 2024 रोजी अमला गेट कोल माइंस 2 मधे माती उत्खननासाठी विस्फोट घडविण्यात आले. या विस्फोटकाच्या अधिक तीव्रतेमुळे एकोणा माईंस अंतर्गत येणाऱ्या मार्डा गावातील  मारुती नारायण मुके यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले. सुदैवाने राहत्या घरात कोणीही नसल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मौजा मार्डा गाव प्रकल्पग्रस्त असल्यामुळे सदर गावाचे पुनर्वसन करण्याचे ठरले आहे असे वे.को.ली. प्रशासन म्हणतात. परंतु आज पर्यंत गावाचे हाल जैसे थे आहे. एकोना अमला गेट कोल माइन्स ने नदीपात्राला तयार करण्यात आलेल्या बांध मुळे गावासमोरील व गावाच्या बाजूची शेती चे पुरामुळे नुकसान होत असून वे.को.ली. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे व कोणत्याही प्रकारची मदत किंवा मोबदला त्यांना देण्यात येत नाही असा आरोप वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपळशेंडे यांनी वे.को.ली. प्रशासनावर केला आहे. तत्काळ नुकसानग्रस्त घराची चौकशी करून सदर कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा च्या वतीने सदर कुटुंबाला घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी दिला आहे.

यावेळी आम आदमी पार्टी चे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले, वरोरा तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपळशेंडे, युवा नेते रोहन गाज्जेवार, बंटी खडके व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker