आरटीआय न्युज स्पेशल

सिकलसेलच्या रुग्णांना कायमस्वरूपी 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्या -बहुजन मेडिकोज असोसिएशनची मागणी

मुख्य संपादक- हिमायुँ अली, मोबाइल नंबर - 8975250567

चंद्रपूरमधील वैद्यकीय बंधुभगिनींच्या वतीने, बहुजन मेडिकोज असोसिएशनने सरकारच्या निदर्शनास आणून दिले की, आमच्या प्रदेशातील सिकलसेल रोगाने (SCD) ग्रस्त रुग्णांना मदत वाढवण्याची नितांत गरज आहे. सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार आहे सिकलसेल चे दोन प्रकार असतात एक AS पॅटर्न आणि एक SS पॅटर्न.

AS प्रकारच्या सिकलसेल आजारामध्ये लक्षणांची तीव्रता फार कमी असते आणि काही परिस्थितीमध्येच तो रुग्णांना जास्ती त्रासदायक असतो पण

 SS पॅटर्न मध्ये वयाच्या पहिल्या वर्षी पासूनच या आजाराची लक्षणे दिसून येऊ लागतात आणि जसं जसं वय वाढत जाते त्याच्या लक्षणांची आणि हिमोग्लोबिनच्या कमी होण्याची तीव्रता वाढत जाते

हिमोग्लोबिन अतिशय कमी पातळीवर येणे रुग्णाच्या पोटामध्ये आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणे ज्याला पेनफुल क्रायसिस(Painful Crisis) म्हणतात . कालांतराने कमरेच्या हाडाची झीज होणे ज्याला अव्यस्कुलर नेक्रोसिस ऑफ हेड फिमर म्हणतात ज्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट शिवाय दुसरा उपाय उरत नाही इतका प्रचंड त्रास SS पॅटर्नच्या रुग्णांना होतो

बरेच रुग्ण वयाच्या विसी मध्ये आणि तिशी मध्ये या आजाराला बळी पडतात आणि त्यांना आपला जीव गमवावा लागतो

 चंद्रपूर हे देशातील सर्वाधिक बाधित क्षेत्रांपैकी एक आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण या दुर्बल आजारामुळे बळी पडतात, त्यामुळे वैद्यकीय, भावनिक आणि आर्थिक आघाडीवर कुटुंबांना मोठा फटका बसतो.

 असोसिएशनने, SCD बाधित रूग्णांना कायमस्वरूपी अपंगत्वाच्या 40% पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे , वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत अशी विनंती  सिव्हिल सर्जन महादेव चिंचोले, शासकीय रुग्णालय चंद्रपूर यांना एका निवेदनाद्वारे केली या निवेदनाला जिल्हा शल्य चिकित्सकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे

निवेदनदेताना बहुजन मेडिकोज असोसिएशनचे प्रतिनिधी :डॉ.अभिलाषा गावतुरे,डॉक्टर बंडू रामटेके, डॉक्टर राजू ताटेवार डॉ.राकेश गावतुरे, डॉक्टर राकेश वनकर डॉक्टर समृद्धी वासनिक आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker